Monday, February 21, 2011

दामूच्या गोव्याक् वयता... भाग २, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

संपादन : आप्पा कुलकर्णी


पणशीकर गोष्टीवेल्हाळ. त्यांना गप्पा मारणं, गप्पांची मैफिल जमवणं आणि त्यात त्यांच्या अनुभवाचे रंग भरणं याचा विलक्षण आनंद. कितीतरी गोष्टींची नवी आवृत्ती ऐकायला मिळायची. पण एखादा गायक त्याच्या साधनेतून, चिंतनातून एकाच रागाची अनुपम अशी विविध रूपं आपल्या अनेक मैफलीतून ऐकवत असतो आणि रसिकांना प्रत्येकवेळी नवा आनंद देत असतो तसाच आनंद पणशीकर अनेक गप्पांमधून देत राहिले. कोणी त्यांची मुलाखत घ्यायला आला तर तयारी, थोडे प्रश्न मग ते कशा पध्दतीनं घेऊ हा प्रकारच नव्हता. मुलाखत घेणारा तयारीनिशी यायचा, त्याला काहीही विचारायची मुभा असायची. पंत फक्त त्याला थोडा मोकळा करायचे, रिलॅक्स करायचे, त्याला सांगायचे ‘फक्त एक लक्षात ठेवा मी थोडा विस्तारानं म्हणजे पाल्हाळ लावून काही सांगायला लागलो ना, तर मला मधेच अडवायचं, नाहीतर मी थांबणार नाही..’ अर्थात त्यांना थांबवण्याऐवजी त्यांचं बोलणं ऐकत रहावसं वाटे! आपलं म्हणणं मांडताना, लिहिताना विषयांतर व्हायचं. पणशीकर दुस-या विषयात मुक्त विहार करायचे पण मूळ विषयाकडे दुर्लक्ष करून भरकटतच कधीच जायचे नाहीत. तो मूळ विषय त्यांच्या डोक्यात पक्का असायचा. ते लिहिताना सांगायचे ‘आप्पा या छोटया छोटया गोष्टींच्या निमित्तानं हे असं आठवतं. काही गेलेल्या लोकांची आठवण निघते, त्यांचीही नावं घेणं, त्यांचेही स्मरण करणं महत्त्वाचं वाटतं, म्हणून हे मी या थोडं विषयांतर केलं.’ त्यामुळेच त्यांचं सागणं प्लॅन्ड नव्हतं. ते विषय ठरवत त्यावर आमचं बोलणं होत असे. बोलताना वेगळाच विषय सूचायचा त्यावर लिहिणं व्हायचं. ‘आप्पा, कुठंतरी ‘पंच्याहत्तरी नंतर’ असम लिहून ठेवा. त्यावर काही लिहूया.’ त्यांना नवनवीन विषय सूचायचे. सारी माडणी डोक्यातच असायची, ती घटलेली, घोकलेली नसायची. विषय कोणता, त्याला अनुसरून त्याची कशी मांडणी करायची, शैली-शब्द सारं यायचं, आतून यायचं मनापासून यायचं. माझी तर खात्री होती की, बावन्ना भागांनंतरही ‘आठवणीतले मोती’ असेच पुढे चालू राहिले असते तरी शिंपीत जसा पाण्याचा टपोरा थेंब पडून नव्या झळाळीचा नवा मोती तयार होतो तशा त्यांच्या आठवणीच्या शिंपीत त्यांच्या तल्लख स्मरणाचा थेंबुटा नव्या झळाळीची मौतिक घेऊन तुमच्या भेटीला आला असता, पण पंतच वेगळ्या प्रवासाला, अद्याताला भेटायला निघून गेले. त्यांच्या शब्दातून काही काळ का होईना ते भेटणार आहेत हेच समाधान!
 
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर


No comments: