Monday, February 21, 2011

साबुदाणा खिचडी

साहित्य:


१) साबुदाणा २ वाटया
२) हिरव्या मिरच्या ५-६
३) दाण्याचे कूट २ वाटया
४) जिरे अर्धा चमचा
५) कोथिंबीर १ मूठभर
६) खवलेला नारळ १ वाटी
७) तूप १ टेबलस्पून
८) मीठ चवीनुसार
९) साखर चवीनुसार

पूर्वतयारी:

१. साबुदाणा चाळून निवडून स्वच्छ भिजवावा. पातेल्यावर झाकण ठेवून दोन तास ठेवावा.
२. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

कृती:
१. साबुदाणा भिजल्यावर हाताने मोकळा करून त्यात दाण्याचे कूट २ वाटया घालावे.
२. हिरव्या मिरच्या, चिमूटभर जिरे, व थोडी कोथिंबीर घालून वाटून साबुदाण्यात घालाव्यात. मीठ, साखर चवीनुसार घालून साबुदाणा हाताने सारखा करावा.
३. जाड बुडच्या पातेल्यात किंवा कढईत २ टेबलस्पून तूपाची फोडणी करावी. त्यात पाव चहाचा चमचा जिरे घालावे.
४. कालवलेला साबुदाणा तूपाजि-यात फोडणीला घालून खिचडी चांगली परतावी.
५. गॅस अगदी मंद करून पातेले पातळ असेल तर पातेल्याखाली तवा घालून खिचडीवर झाकण ठेवून दोन मंद वाफा येऊ द्याव्यात. आवडत असल्यास अर्ध्या लिंबाचा रस घालावा.
७. वरून खोबरं, कोथिंबीर घालून गरम खिचडी खाण्यास द्यावी.

दक्षता:

१. मिरच्या वाटून लावायच्या नसतील तर फोडणीत मिरच्यांचे तुकडे घालावेत. पण मिरची, कोथिंबीर वाटून लावल्याने खिचडीला रंग छान येतो.
२. साबुदाणा भिजवताना थोडे पाणी त्यात राहू द्यावे. पाणी ठेवले नाही तर खिचडी फार तडतडीत व मोकळी होते.
३. साबुदाण्यात पाणी जास्त राहिले तर खिचडी गोळा होऊन चिवट लागते.
४. साबुदाणा भिजवण्यापूर्वी थोडा भाजून घेतला तरी छान भिजतो.

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments: