Saturday, February 19, 2011

गोष्ट एका स्थळाची, शुभमंगल सावधान, विवाह समुपदेशक, मंगला मराठे

“मी अमित. मी खूप सोशल आणि ऍक्टिव आहे. माझा मित्र परिवार प्रचंड आहे. मी प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करतो. नोकरी व्यतिरिक्त मी मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाची शिबिरे घेतो. माझे बहुतेक रविवार आमच्याच शिबिरात किंवा इतर ठिकाणी भाषण करण्यातच जातात. आज खूप दिवसांनी श्रोत्यांमधे बसतोय. नाहीतर नेहमी माइकच्या त्या बाजूलाच असतो. मी बोलतो लोक ऐकत असतात. माझी बायको सोशल असावी, ऍक्टिव असावी, तिला सगळ्या गोष्टींमधे इंटरेस्ट असावा.” विवाहपूर्व मार्गदर्शनाच्या कार्यशाळेत अमितने त्याची ओळख करून दिली. अमित खरोखर तरतरीत आणि बोलका होता. एकूण व्यक्तिमत्त्व छाप पडणारे होते. पुढे संपूर्ण कार्यशाळेत तो चर्चांमधे सहभागी झाला. त्याला बोलण्याची सवय होती. वक्तृत्त्व चांगलं होते. अमित प्रत्येक मुद्यावर इतरांच्या मनात उतरणारे बोलला. एकूण त्याने गट जिंकला. तिथल्या मुली किती इम्प्रेस्ड झाल्या हे वेगळं सांगायलाच नको.

करता करता चर्चा समानतेच्या मुद्यावर आली. नेहेमीप्रमाणे मुली पोटतिडीकीने बोलत होत्या. मुलांना ते पटत होतही आणि नव्हतंही. काही गोष्टी त्यांच्या बुद्धीला पटत होत्या पण मनाला रुचत नव्हत्या. अमित म्हणाला, “ मुलींनी नोकरी करावी पण शाळेत किंवा सरकारी क्षेत्रातच करावी. आज खाजगी क्षेत्रात जे वर्ककल्चर आहे त्यात बायकांनी पडू नये. तिथे जायची वेळ ठरलेली असते, घरी यायची नाही. असलेल्या रजा मिळत नाहीत तर आपल्याला हवी तेव्हा कशी मिळणार? घरच्या अडचणींसाठी, मुलांसाठी, सणासुदीसाठी बायकांना रजा लागतात.”

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर