Saturday, February 19, 2011

कोंडीबाचं ‘ईमान’ चाललं भाग - २, हास्यवाटिका, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, निवास गुळवणी यांचा लेख


कोंडीबा विमानानं वैकुंठाला चालला असल्याची समजूत करून घेत विमानतळावर गल्लीतील मावश्या, मामालोक, हरीतात्या गोदाक्का, विष्णूपंत, पिंटया, चिंटया, बबल्या झाडून सगळी मंडळी निरोप द्यायला हजर झाली. तिथं मग कोणी दरवाजा समजून काचेलाच धडकला, कोणी सामानाच्या ट्रॉलीत पोरं-टोरं बसवून विमानतळाची यात्रा करायला सुरूवात केली. चिमुरडयांनी तिथल्या गुळगुळीत फरशीवर फतकल् मारत गारगोटयांचा खेळ मांडला. कोंडीबाखेरीज आत जाण्यास कोणालाही प्रवेश न दिल्याने बाया-बाप्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. 
"तुमच्यासारखाच वॉचमेन हाय त्यो. एवढंदेखील कळत नाय का तुमास्नी," सारजाक्का हातवारे करीत पोलिसाला हग्या दम भरण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.
"आक्का, हे खाकी वर्दीवालं नाही ऐकायचे. त्यास्नी माणुसकी नाय. त्येला त्येच्या ईमानाची अप्रूपाई वाटतीया." आणि मग सोपानराव गर्रकन वळून सुरक्षा रक्षकाला म्हणाला, "पर ध्येनात ठेव, आमीबी मोठया रेल्वेगाडीतनं प्रवास केलाय म्हटलं हां. कोनी बी आमास्नी टोकलं नाय. संम्दी प्लाटफॉर्मवर जमली व्हती." 

शेवटी पोलिस ऐकत नाहीत हे पाहून कोंडीबानं तिथंच सा-यांचा निरोप घेतला. पोलिसांच्या डोक्यावरून आत उभ्या असलेल्या कोंडीबावर असंख्य सूचनांचा भडीमार करण्यात आला. हात बाहीर काढू नकोस, भूक लागली तर फणसाचं गरं दिल्यात ते खा, सुंठवडा खा म्हंजे ईमान लागणार नाय, ढगात गेलास की मला कोंडीबामामा हात कर(पण मग लागलीच त्या पोराच्या पाठीत धप्पाटा घालीत कोणीतरी, "हात बाहीर काढायचा नाही म्हणून सांगितलं ना?" असं धमकावलं). ईमानाचा आवाज लई मोठा तवा कानात कापसाचं बोळं घाल - ह्या ना त्या सूचना ऐकून मग एकदाचा कोंडीबा निघाला. 

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: