"मी कुठंही येणार नाही, सांगितलं ना एकदा?"
"कशी येत नाहीस तेच बघते. माझी पोरं माझ्या आज्ञेत हाईत. लगीन लागल्याबरोबर तुला उचलून टेम्पोत टाकून न्यायला सांगते त्यास्नी. खळं सारवता येत नव्हं?" करारी म्हातारी ठसक्यात म्हणाली.
"शी: बाई, ही काय कटकट आहे."
"कटकट-बिटकट काय नाही," म्हातारी धारदार स्वरात म्हणाली. "बोचकं बांधून तयार रहा. धाकल्या दादल्याबरोबर शालू पाठवते तो नेस आणि लगीन लागलं की चल गावाकडं. नाहीतर-"
"नाहीतर-नाहीतर काय करशील?"
"काय करशील? उचलतांगडी करून टेम्पोत टाकून थेट आधी मेणचवलीला. तिथं मांत्रिकाकडनं तुझं हे भूत उतरवते आणि मग थेट गावाकडे," म्हातारी ठसक्यात म्हणाली.
आणि ते मावशीच्या पारगावच्या शेतात हनीमूनला?" धनंजय म्हणाला.
"आरं आमच्या गावात काय शेतं कमी हाईत का! जातील कुठंतरी," म्हातारी उठून जाण्याच्या तयारीत म्हणाली. "हिला ब-या बोलानं तयार करा. रेठरे-बुद्रुकची फटूमावशी म्हणत्यात मला . भलाभल्यांचा टाका ढिला केलाय म्याँsss" आणि धमकी देऊन म्हातारी तणतणत निघून गेली.
"ए हा काय प्रकार आहे?" केटी वैतागून म्हणाली. "थांब, मी पोलिसांनाच बोलावते आणि देते तिला पोलिसांच्या ताब्यात."
"एका पोलिसला मी आत्ता बँडवाल्यांबरोबर पाहिलाय," धनंजय म्हणाला. "हाक मारतो थांब, चांगलीच अद्दल घडव सासूबाईंना." आणि धनंजय लगबगीनं गेला आणि एका पोलिसाला घेऊन आला.
"कंम्प्लेंट काय आहे?" पोलिस जड आवाजात म्हणाला.
"ह्यांच्या सासूबाई"
"ए ती थेरडी माझी सासू वगैर काही नाही. आधीच सांगून ठेवते."
"अगं लग्न लागल्यानंतर तुझी सासू नाही का होणार त्या?"
"ती खेडवळ बाई मला धमक्या देऊन गेलीय.. तिचा बंदोबस्त करा."
"कोण बाई? तिचं वर्णन सांगा," पोलिस वही पेन काढीत म्हणाला.
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments:
Post a Comment