Friday, February 4, 2011

यंदा कर्तव्य आहे (?), शुभमंगल सावधान, विवाह समुपदेशक, मंगला मराठे यांचा लेख


लग्न ही आयुष्यातली खूप महत्वाची घटना असते. त्या व्यक्तीच्या आयुष्यातली, पालकांच्या आयुष्यातली आणि त्याच्या कुटुंबातली सुद्धा. मुलांचे शिक्षण झाले ती कमवायला लागली की पालकांना त्यांच्या लग्नाचे वेध लागतात. मुलांची लग्न ही पालक आपली सांसारिक जबाबदारी मानतात.
मुलाचे (मुलगा किंवा मुलगी दोन्ही) लग्न ही त्यांना जबाबदारीही वाटते आणि त्यांच्यासाठी तो आनंदाचा हौसेचा सोहळा असतो.

आपण लग्न ही केवळ वधू आणि वराची वैयक्तिक गोष्ट मानत नाही. लग्नाने दोन कुटुंब जोडली जातात असे आपण म्हणतो . काही वेळा लग्न केवळ घराची गरज म्हणून जमवले जाते.

कधी आजी किंवा आजोबांना नातवाचे /नातीचे लग्न बघायचे असते. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पालक मुलांची लग्न घाईघाईने त्यातल्या त्यात बरे स्थळ बघून करून टाकतात. यात आई वडिलांना मुलांच्या भविष्याची काळजी नसते असे नाही. पण म्हातार्‍या आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्याच्या भावनिक गुंत्यात ते अडकतात. मुलांनाही अशावेळी काही बोलण्याचा मोकळेपणा रहात नाही. अख्या कुटुंबाचा भावनिक दबाव त्यांच्यावर असतो. ती लग्नाला तयार होतात. मात्र आपल्यावर हे लग्न लादले गेले आहे हा सल त्यांच्या मानत कायम राहू शकतो. तसे झाले तर हे लग्न सुखाचे होण्याची शक्यता कमीच. या पेचात कठीण असले तरी मुलांच्या पालकांनी मुलांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. त्यांनी आपल्या पालकांना समजावले पाहिजे की हा मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तो आपल्या हौसेसाठी घाईघाईने कसातरी सोडविणे योग्य नाही.

दुसरे सर्रास दिसणारे कारण म्हणजे मुलाच्या आईची तब्येत बरी नसते. म्हणून घरात वावरणारी गृहिणी हवी. आजूबाजूचे लोकही ‘तुमची तब्येत ठीक नसते मग आता घरात सून आणा’ असा आग्रह करतात.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: