Monday, March 14, 2011

घटस्फोटाच्या विळख्यात भाग-२, शुभमंगल सावधान, विवाह समुपदेशक, मंगला मराठे यांचा लेख

महानगरात, उच्चशिक्षितांमध्ये प्रमाण जास्त का?


गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये महानगरात कुटुंबाचे स्वरूप खूप बदलले. मुले आणि मुलीही उच्च शिक्षण घेऊ लागल्या, माध्यमांचा प्रसार झाला. जागतिकीकरणाने जग जवळ आले. शहरीकरण वाढले. प्रत्येक माणूस हे एक वेगळे युनिट झाले. आपले व्यक्तिमत्त्व, आपली विचारसरणी याचे प्रत्येकाला भान आले. घराघराच्याच नाही तर एकाच घरातल्या माणसांच्या जीवनशैलीतही विविधता आली. विविधतेबरोबर आवडणे-न आवडणे, पटणे-न पटणे आले.

लग्नानंतर दोन वेगवेगळ्या घरातील दोन माणसे एकत्र येतात तेव्हा हा फरक प्रकर्षाने जाणवतो. लग्नानंतर आयुष्य पहिल्यापेक्षा अधिक दु:खी, कष्टप्रद झाले तर आपली निवड चुकली. वाट चुकली तर विनाकारण पुढे जाता न रहाता मागे फिरावे. आयुष्यभर फरफटत रहाण्यापेक्षा एकदाच काय तो धक्का लागेल. पण मोकळे होता येईल. नवीन वेगळे आयुष्य सुरू करता येईल. या विचाराने घटस्फोटाचा निर्णय घेतात. हा विचार बरोबर आहे पण शेवटचा उपाय म्हणून. घटस्फोट ही सगळ्या आयुष्यावर परिणाम करणारी घटना आहे. पुरेसा विचार करून हा निर्णय घ्यायला हवा. नेमका तोच आज होतोय की नाही याची शंका येते.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर


1 comment:

psiddharam.blogspot.com said...

सर्व ब्लॉगर्सना नम्र आवाहन
नमस्कार,

महोदय/महोदया...

मी सिद्धाराम भैरप्पा पाटील, दै. तरुण भारत, सोलापूर येथे उपसंपादक आहेआणि सोलापूर विद्यापीठात पत्रकारितेचे पदव्यत्तर शिक्षण घेत आहे. अभ्यासक्रमात एक विषय लघुशोधनिबंधाचा आहे. त्याअंतर्गत मी मराठी ब्लॉगचाअभ्यास करीत आहे. मराठी ब्लॉगलेखकांकडून मला एक प्रश्नावली भरून हवी आहे. कृपया पुढीलप्रश्नावली भरून मला माझ्या संशोधनात सहकार्य करावे ही विनंती.

1. स्वत:चे पूर्ण नाव :.....................

2. ब्लॉगचे नाव :....................

3. वय :.........

4. शिक्षण-व्यवसाय : .................

5. कोणत्या विषयावर ब्लॉग लिहिता?............

6. वाचकांचा प्रतिसाद कसा वाटतो?

अ) समधानकारक आ) बरा इ) असमधानकारक ई) महित नाही.

4. ब्लॉगिंगला सुरुवात करण्ङ्माआधी लेखन करीत होता का? अ) होय आ) नाही

5. किती वर्षांपासूक ब्लॉगिंग करीत आहात?...........

6. ब्लॉगिंगच्ङ्मा भवितव्ङ्माबद्दल आपले मत सांगा............

कृपया शक्य तेवढ्या लवकर ही प्रश्नावली भरून पाठवावे ही विनंती.

मला 9325306283 या क्रमांकावर एसएमएस करून किंवा तुमचा मोबाईल क्रमांकपाठविलात तरी मी फोवरून माहिती घेईन.उत्तराच्या प्रतिक्षेत.

सिद्धाराम पाटीलpsiddharam@gmail.comधन्यवाद.