Monday, March 28, 2011

राशी-भविष्य

मेष

आजपासून महिनाभर बुध आपल्या राशीतून भ्रमण करणार आहे. या महिन्यात नोकरीमध्ये आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडा अन्यथा नोकरीवर बेतण्याची शक्यता आहे. लोकांच्या बोलण्याकडे कानाडॊळा करून आपले काम निमुटपणे केल्यास चार पैसे जास्त मिळतील. तसेच प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रकृतीची तक्रार अंगावर काढू नका व डॉक्टरांचा सल्ला घ्या. फार कमी श्रमात जास्त उत्पन्न मिळेल.

वृषभ

आजपासून महिनाभर बुध आपल्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे. या महिन्यात बुधाचा हर्षलाशी व्ययस्थानात होणारी युती संशोधन कार्याला चालना देईल. संशोधनासाठी नवी दिशा मिळेल. प्रत्येक कामात अडचणी येणे असे अनुभव येतील परंतु चिकाटीने त्यातून मार्ग काढाल. मानसिक अस्वास्थ्यता वाढेल. प्रवासाचे योग येतील.

मिथुन

आजपासून महिनाभर बुध आपल्या लाभ स्थानातून भ्रमण करणार आहे. या महिन्यात लाभस्थानातील बुध पैशासाठी अनुकूल आहे. परंतु पैसा मिळण्यात थोडे कष्ट पडतील. अपेक्षेप्रमाणे फायदा मिळणार नाही. ओळखीच्या लोकांना किंवा मित्रांना पैसे उधार देण्याचे टाळा अन्यथा ते परत मिळणे मुश्किल होईल. शिक्षणात अडथळे येतील किंवा खंड पडण्याची शक्यता आहे.
 
कर्क

आजपासून महिनाभर बुध आपल्या दहाव्या स्थानातून भ्रमण करणार आहे. या महिन्यात व्यापरात थोडे नुकसान सहन करावे लागणार आहे. एक गोष्ट मिळण्यासाठी वारंवार फे-या माराव्या लागतील. कोणतेही काम सरळ हाती होणे कठीण होऊन बसेल. प्रगतीत अडचणी येतील. राजकीय लोकांसाठी अनुकूल महिना आहे.

राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य

No comments: