Monday, March 28, 2011

कर्तबगारांची नगरी भाग - १ , आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

पणशीकर दौ-यावर गेले की, नाटकाचा वेळ सोडून ते तिथल्या बाजारात फिरायचे. अर्थातच ते त्यांना स्वत:साठी काही आणायला जायचे नाहीत. आपल्या नाटकासाठी, आगामी नाटकाच्या निर्मितीसाठी काही वैशिष्टयपूर्ण गोष्टी मिळताहेत का याचा ते शोध घेत. निरनिराळ्या गोष्टींचा वेध घेण्याची त्यांची सवयच होती. ‘तो मी नव्हेच’ साठी आचार्य अत्रे यांच्याबरोबर ते खरेदी करायला गेले होते. त्यावेळी अत्रेसाहेबांचा खर्च करतानाचा हात किती सढळ होता आणि त्या मागचा त्यांचा विचारही किती वेगळा होता हे ते पणशीकर नेहमी सांगत. दिवाकर दातार रूबाबदार दिसावा यासाठी सुटासाठी अत्रेसाहेबांनी महागातलं उंची कापड खरेदी केलं. एवढंच नाही तर दोन इंपोर्टेड रूमाल घेतले आणि पेन्स घेतली. पंतांनी साहेबांना विचारलं "साहेब इतके किंमती रूमाल आणि पेन्स घेऊ नका. ते नेहमी चोरीला जातात". साहेबांनी विचारलं "मग तुम्ही काय करता?" "आम्ही रूमाल अर्धे कापून वरच्या खिशात ठेवतो आणि पेनचं फक्त टोपणंच खिशाला लावतो, म्हणजे त्या वस्तू कोणी पळवून नेत नाही" पंतांचे हे व्यवहारचतुर उत्तर ऐकून साहेब आपली प्रशंसा करतील असं त्यांना वाटलं होतं पण साहेब म्हणाले, "पणशीकर ही पेन्स आणि रूमाल चोरीला जातात म्हणून घ्यायचीच नाहीत असं करू नये. हे प्रेक्षकांसाठी आहे. प्रेक्षक आपला वेळ आणि पैसा खर्च करून नाटकाला येतात.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: