Monday, March 7, 2011

घटस्फोटाच्या विळख्यात, शुभमंगल सावधान, विवाह समुपदेशक, मंगला मराठे यांचा लेख

घटस्फोटावर लिहावे असे वाटते कारण आपल्याकडचे घटस्फोटांचे प्रमाण चिंताजनक वाटावे इतके वाढत आहे. अनेक जोडप्यांमध्ये सुसंवाद नसतो. ते एका घरात रहातात इतकेच. गुण्या गोविंदाने आनंदाने नांदणारे घर ही दुर्मिळ गोष्ट झाली आहे. पालकांना मुलांच्या ऍडमिशन इतकेच मुलांच्या लग्नाचे टेन्शन येते. मुलांची संख्या कमी झाली आहे. घरात एकुलते एक फारतर दोन मुले असतात. परिणामी विवाहेच्छू मुला मुलींची संख्या कमी झाली आहे. त्यातून योग्य स्थळ मिळून लग्न जमणे कठीण होऊन बसले आहे. लग्न झाले की टिकेल की नाही ही शंका असते. पालकांना वाटते "मुलांना जबाबदारी नको, त्यांना कसले गांभिर्य नाही. त्यांच्या हातात पैसा खेळतोय त्याचा त्यांना माज आलाय." वस्तुस्थिती मात्र तशी नाही. सगळी तरूण मुले -पिढीच्या पिढी बेछूट, बेजबाबदार कशी निपजेल? मुळात ही मुले वाईट नाहीत. त्यांना जमवून घेणे जमत नाही, उमगत नाही. भोवतालच्या परिस्थितीतल्या अनेक घटकांचा हा परिणाम आहे, ही परिस्थिती समजून घेतली तर आपल्या वागण्यातल्या त्रुटी कमी करता येतील. दोघा सोयीचा मध्यम मागे शोधता येईल. अशी आशा आहे. म्हणून हा उहापोह केला आहे. 

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: