Monday, February 14, 2011

रताळी पाक

साहित्य:


१) रताळी           २५० ग्रॅम
२) तूप               पाव वाटी
३) खजूर            २०० ग्रॅम
४) आले             १ इंच
५) साखर          १ कप

पूर्वतयारी:

१. लहान व लांबट आकाराची रताळी स्वच्छ धुवून घ्या.
२. नंतर ती अर्धी कच्ची तळून उकडून घ्या. थंड झाल्यावर त्यांच्या अर्धा इंच जाडीच्या गोल चकत्या करा.
३. रताळी सोलण्याची गरज नाही. मात्र दोन्ही टोकांचे तुकडे हे सुरूवतीलाच काढून टाकून शिजवून घ्यावीत.
४. खजूरातील बिया काढून टाका. खजूर स्वच्छ धुवून घ्या. एकेक खजूराचे प्रत्येकी ६ उभे तुकडे करा.
५. आले धुऊन, पुसून, सोलून त्याच्या पातळ गोल चकत्या करा.

कृती:

१. जाड बुडाच्या लहान पातेल्यात साजूक तूप तापवून त्यात प्रथम रताळ्याच्या चकत्या लालसर तळून घ्या.
२. मग आले व शेवटी खजूर तळून घ्या. चाळणीवर निथळत ठेवा..
३. जाड बुडाच्या पातेल्यात किंवा फ्राय पॅनमध्ये साखर घालून मंद आचेवर तापत ठेवा.
४. साखर भिजेल एवढे पाणी घाला. थोडे थोडे ढवळा. प्रथम साखर वितळेल.
५. मग हळूहळू बुडबुडे येतील. नंतर त्या पाकाला लालसर सोनेरी रंग येईल.
६. मग त्या पाकात रताळी, आले व खजूर घालून एकदाच हलके परता व लगेच आचेवरून उतरवून      त्यावर झाकण ठेवा.
७. थंड झाल्यावर खाण्यास द्या. छान लागतात.

टीप:
१. हा पदार्थ चविष्ट तर आहेच शिवाय पौष्टीक पण समजतात. लहान मुलांनाही आवडण्यासारखा आहे. आपल्याकडे हा पदार्थ उपवासालाही चालेल. झटपटही होऊ शकतो. स्वीटडिश म्हणूनही वेगळा असा आहे.


अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद






1 comment:

प्रशांत दा.रेडकर said...

छान माहिती आहे,
माझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/