Monday, February 7, 2011

माझे भाग्यविधाते, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

प्रस्तावना : आप्पा कुलकर्णी

‘आठवणीतले मोती’ सदर एकोणचाळीस भाग होईपर्यंत प्रभाकर पणशीकर आपल्याशी संवाद साधत होते. आपल्या मायबाप रसिकांच्या प्रतिसादानं उत्साहानं एकेक मोती आपल्यापुढे ठेवत होते. आज ते आपल्यात नाहीत पण त्यांनी यापूर्वी काही लेखन केले होते. त्याचे समोर बसून मी ते लिहून घेतले होते. ते त्यांचे लेखन-तो त्यांचा संवाद आपल्यापुढे ठेवताना मनात संमिश्र भावना आहेत. एकीकडे हा त्यांचा आठवणीतील मोत्यांचा एकेक मोती आपणापर्यंत पोहोचवता येत आहे, याचे समाधान आणि पंत आपल्यासोबत नाहीत ही कटू, मन विषण्ण करणारी वस्तूस्थिती अधिकच दु:ख देणारी आहे. पंत ‘शो मस्ट गो ऑन’ हे मानणारे होते. माणूस गेला-नट गेला तरी त्या भूमिकेचा मुखवटा दुसरा कोणी चढवतो. परत रंगदेवतेची पूजा होते, परत धूपाचा दरवळ पसरतो, परत खणाणणारी घंटा रंगमंच व्यापते आणि नव्या नटाच्या मदतीने नाटकाचा प्रयोग सुरू होतो, तो प्रयोग असतो. प्रयोगात पूर्वीसारखेच यश मिळेल की नाही, माहित नसते. लोकांना या आधी काम केलेल्या नटाची आठवण येईल की त्याच्या बदली नव्याने आलेला ती आठवण पुसेल? काहीच सांगता येत नाही. सारं मायबाप आणि तो नटेश्वर यांच्या भरवशावर चाललेलं असतं. पण तो शो पुढे चालत राहणं ‘मस्ट’ असतं. तोच ‘मस्ट’चा धागा धरून हा खेळ पुढे चालणार आहे.

मो.ग. रांगणेकर- पणशीकर ज्यांना ‘माझे भाग्यविधाते’ म्हणत त्या त्या रांगणेकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेला त्यांच्या आठवणीतला एक मोती रसिक वाचकांसमोर ठेवत आहोत. पणशीकर आणि रांगणेकर यांच्यातले भावबंध, त्यांना रागणेकरांनी दिलेलं ममत्व, स्नेह आपुलकी यातून जाणवते, त्यांच्यावर टाकेलला विश्वास जाणवतो. रांगणेकरांनी पणशीकरांवर प्रसंगी कोर्टात केसही केली. पंतांचा उमद्या स्वभावानुसार ‘आले देवाजीच्या मना...’ असं ते तो कटू इतिहास सांगायचा टाळतात. त्यांच्या लेखी भांडणे, मतभेद त्यातून आलेला दुरावा या पेक्षा रांगणेकरांनी किती शिकवलं, भरभरून दिलं आणि आपलं जीवन किती समृध्द केलं, हेच पणशीकर जपतात.

पणशीकरांचा हा लेख त्यांच्याच भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवताना आपल्याला रांगणेकरांचे दर्शन होईलच, पण त्याहीपेक्षा पणशीकर नटवर्य प्रभाकर पणशीकर माणूस म्हणून खरंच किती मोठे होते, याचं दर्शन होईल हे नि:संशय! 


लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: