Friday, February 11, 2011

कैरीचा भात


 साहित्य:

१)  तांदूळ                  एक वाटी
२)  कैरीचा किस        पाव वाटी
३)  काजू                    पाव वाटी
४)  सुके खोबरे
५) शेंगदाणे                पाव वाटी
६)  साखर                  चवीनुसार
७)  तेल
८)  मोहरी

फोडणीचे साहित्य:

१. उडीद डाळ             १ चमचा
२. हिरव्या मिरच्या    १ चमचा
३. कोथिंबीर

पूर्वतयारी:

१. मोकळा भात शिजवून घ्यावा.
२. सुक्या खोब-याचा किस गुलाअबीसर भाजून भातात घालावा.
३. थोड्या तेलात दाणे आणि काजू तळून तेही भातात घालावे.
४. साखर मीठ अणि कैरीचा कीस भातात मिसळून भात हाताने मोकळा करावा.

कृती:
१. एका कढल्यात तेल तापवून मोहरी, हिंग, हळद उडीद डाळ, मिरच्या आणि कढीपत्ता घालून भात ढवळावा.
२. कोथिंबीर घालून खायला द्यावा.

टीप:
१. हा गार गरम कसाही छान लागतो.
२. गरम हवा असल्यास पुन्हा भांड्यात भरून तव्यावर ठेवून गॅसवर गरम करावा.

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments: