Saturday, February 5, 2011

गुलाबजाम


साहित्य:

१) खवा अर्धा किलो
२) पनीर १०० ग्रॅम
३) दूध
४) साखर
५) गुलाबपाणी


पूर्वतयारी:

१. खव्यात पनीर एकत्र करून भिजवावेत.
२. साखरेचा पाक करावा. त्यात गुलाबपाणी घालावे.

कृती:

१. वरील भिजवलेल्या खवा व पनीरचे गेळे करावेत.
२. गोळे करून घेताना त्यात एक एक वेलदोडयाचा दाणा घालावा.
३. चव आणि वास अतिशय छान येतो.
४. मग गुलाबजाम तळावेत व साखरेच्या पाकात घालावेत.
५. वाढण्यापूर्वी मंद आचेवर गरम करून घ्यावे.

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

1 comment:

epundit said...

ही पनीर ची addition नवीन आहे...मी कधी ऐकली नव्हती..फक्त खाव्याचेच गुलाबजामून ऐकले,केले आणि खाल्ले आहेत...तरी करेन हि पद्धत सुद्धा... good one