Wednesday, February 23, 2011

शॉर्टसेल - पडत्या शेअरवर कमाई, दामदुप्पट, गुंतवणूक सल्लागार, मनोहर दांडेकर यांचा लेख

स्टॉपलॉसच्या माध्यमातून शेअर बाजारात आपला तोटा आपण सिमीत करू शकतो हे आपण मागील लेखात पाहिले. त्याचप्रमाणे शेअरच्या भावातील घसरणीचा फायदा घेण्यासाठी शॉर्टसेलची सुविधा ब्रोकरकडून शेअर ट्रेडरला पुरवली जाते. सामान्यतः शेअर खरेदी करणे आणि किंमत वाढली की आपल्याकडे असलेले हे शेअर्स विकणे असा साधा व्यवहार आपल्या डोळयासमोर असतो, पण शेअर हातात नसले तरी ते विकता येतात, या व्यवहाराला 'शॉर्टसेल' म्हणतात. फायदा मिळविण्यासाठी शॉर्टसेल केले जाते. एखाद्या शेअरचा भाव जर भरमसाठ वाढलेला आहे व त्यामुळे त्याचा भाव आता कमी होईल अशी शक्यता वाटत असेल तर या सुविधेचा फायदा घेऊन जर शेअर बाजार सुरू झाल्यावर काही वेळातच 660रु. भावाने असे 50 शेअर्स विकून टाकले तर त्यामुळे ताबडतोब आपल्या खात्यात 33000 रु. जमा होतील (खरंतर थोडेसे ब्रोकरेजही कापले जाते पण या उदाहरणापुरते ते यातून कापून दाखविलेले नाही). आता तो शेअर पडत चाललेला दिसतोय आपण बाजारावर नजर ठेवून आहोतच. समजा तो शेअर 625रु. झालाय म्हणजे आपण आधी ते शेअर्स विकून जेवढे पैसे कमावले त्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करायची संधी मिळणार असते, त्यामुळे आता आपण ब्रोकरने उसने दिलेले शेअर्स खरेदी करून त्याला परत देऊन टाकायचे आहेत, त्यामुळे आपण या भावात 50 शेअर्स विकत घेतले तर आपल्या खात्यात जमा दाखवत असलेल्या रक्कमेतून 31250 रुपये या खरेदीपोटी आपला ब्रोकर सेबीसाठी कापून घेईल म्हणजेच आपल्याला वरील रकमेच्या फरकाचा फायदा होईल.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर