कोंडीबा वॉचमननं जीवावर उदार होऊन कंपनीच्या मॅनेजरला ओलीस धरणा-या माथेफिरू कामगाराला पकडलं आणि सर्वत्र त्याच्या नावाचा बोलबाला झाला. राज केमिकल्सच्या फाटकासमोर सकाळीच तो अभूतपूर्व प्रकार घडला. गाडीतून उतरलेल्या मॅनेजर महाडिकच्या डोक्यावर झटकन् पुढे येत एका बडतर्फ कामगाराने पिस्तूल रोखले. जमलेले सारे अधिकारी, कामगार अवाक् होऊन पहात राहिले. त्यानं पाच मिनिटात दहा लाख रूपये घेऊन येण्याबद्दल कॅशियरला फर्माविले. जनरल मॅनेजरच्या सूचनेनुसार लागलीच दहा लाख रूपये हजर करण्यात आले. मॅनेजरसह इतरांना पिस्तूलाचा धाक दाखवत दूर राखत गाडीत फिरणा-या त्या माथेफिरूला विद्युत वेगाने हालचाल करीत कोंडीबाने पाठीमागून कवळा मारत धरला. दोघांची झटापट झाली. दोन गोळ्या कोंडीबाच्या कानशिलाला चाटून गेल्या परंतु कोंडीबा डगमगला नाही. त्याच्या एका जोरकस फटक्यानं त्याच्या हातातलं पिस्तूल उडालं आणि मग इतर वॉचमननी त्याला घेरून कब्जात घेतला. सा-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सा-या कामगारांनी आणि अधिका-यांनी कोंडिबाची कंपनीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली. स्त्री कर्मचा-यांनी त्याला ओवाळलं. एका कामगारानं त्याची नवीकोरी टोपी त्याला घातली. हार घातले, फूलं दिली. जनरल मॅनेजरनं त्याची गळाभेट घेतली. महाडिक ह्या कर्तव्यदक्ष अधिका-याचा जीव वाचवताना त्यानं कंपनीची अब्रूही राखली होती.
फॅक्स मशीनमधून कागद बाहेर आला. कंपनीचे चेअरमन पाटगावकरांनी कोंडिबाचे विशेष आभार मानताना त्याला लागलीच विमानानं कंपनीच्या उद्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता पाठविण्याचे आदेशही देण्यात आले. त्याचा सभेत विशेष सत्कार केला जाणार होता. लागलीच हालचाली सुरू झाल्या. कंपनीचे व्यवस्थापक वागळे संध्याकाळच्या विमानानं कोंडीबासह हैद्राबादला निघण्याची तयारी करू लागले.
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर
No comments:
Post a Comment