Friday, January 28, 2011

अंडयाचे सार


साहित्य:

१) अंडी ६
२) कांदे ३-४ मध्यम
३) सुकं खोबरं अर्धी वाटी
४) ओला नारळ अर्धी वाटी
५) लसूण पाकळ्या ६-७
६) सुक्या लाल मिरच्या ५-६
७) कांदा-लसून मसाला अर्धा चमचा
८) मालवणी मसाला अर्धा चमचा

पूर्वतयारी:

१. सुक्या काश्मिरी लाल मिरच्या १० मिनिटे गरम पाण्यात भिजवून घ्याव्यात.
२. एक नारळ खोवून घ्यावा.
३. सुकं खोबरं किसून घ्यावं.
४. अंडी उकडून घ्यावीत.
५. कांदे बारीक चिरून तेलावर तळून घ्यावेत.
६. सुकं खोबरं आणि ओलं खोबरं कोरडं थोडंसं भाजून घ्यावं.
७. तळलेला कांदा, भाजून घेतलेलं खोबरं, लसूण पाकळ्या, लाल मिरच्या, दोन्ही मसाले एकत्र करून मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यावे.

कृती:

१. पॅनमध्ये तेल तापवून त्यात थोडा हिंग आणि हळद घालावी.
२. नंतर वाटलेली मसाल्याची गोळी घालून तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यावी.
३. आवश्यकतेनुसार पाणी घालावे.
४. चवीनुसार पाणी घालावे.
५. चवीनुसार मीठ घालून एक उकळी आणावी.
६. उकडलेल्या अंड्याचे तुकडे करून अथवा अंड्याला लहान चिरा पाडून अंडी ग्रेव्हीत सोडावीत. झाकण ठेवून एक उकळी आणावी.
७. सेव्ह करताना वरून चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments: