
रोज एक सफऱचंद खाल्ले तर ते डॉक्टरला दूर ठेवते’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. पाश्चात्यांत सफरचंदाचे पीक जास्त म्हणून सफरचंदाचे उदाहरण दिले का? असेल कदाचित परंतु सफरचंद या फळात उत्तम गुणधर्म आहेत यात वाद नाही.
फक्त सफरचंदच कशाला, प्रत्येक ऋतूत मिळणा-या सर्व फळात मानवी आरोग्याला हितकारक अशा गुणांचा साठाच असतो. आपण फलाहार करतोही पण स्वीट डीश म्हणून किंवा आंब्यासारख्या फळांच्या ऋतूत आंबे आणून खातो, याव्यतिरीक्त ठरवून फलाहार करायचाच, याचे प्रमाण फार कमी आहे. अर्थात फळांचे भावही खूपच चढे असतात हे एक कारण आहेच. परंतु स्वस्त व नेहमी मिळणारी केळ्यासारखी फळे ही आपण रोज खातो का याकडेही लक्ष द्यायला हवे. फळ म्हणजे अर्थात पक्व फळ हे निसर्गनिर्मीत तयार अन्न आहे. आयुर्वेदीक शास्त्र सांगते की फालाहार जेवणाच्या तासभर आधी करावा. भरपूर जेऊन स्वीट डीश म्हणून फळे खाण्यात आली तर अपचन होण्याची शक्यता बळावते, ती एवढयाचसाठी की फळांत सहज पचन होणारी साखर असते. त्यांचे पचन लगेच सुरू होते. त्यामुळे बाकीचे जडान्न पोटात पडून राहते व आंबते त्यामुळे गॅस होणे, पोट फुगणे अशी लक्षणे दिसू लागतात व ती अपचनाची लक्षणे आहेत. आम्ल रसाची फळे खाऊन नंतर जेवण करावे असे शास्त्र सांगते. त्यामुळे केळे आणि काकडी बाद होतात.
खरे तर मानवाला सर्वात प्रथम नैसर्गिक अन्नाची ओळख झाली ती फळांच्या रूपाने. सर्वच धर्मांच्या प्राचीन साहित्यात फळांचे अनेक संदर्भ सापडतात. बायबलमधील ऍडमने स्वर्गातील सफरचंद खाल्ल्याची कथा सर्वश्रुतच आहे.
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर
No comments:
Post a Comment