
साहित्य:
१) चीक २ वाटया
२) दूध अर्धी वाटी
३) साखर २ वाटया
४) वेलची पूड
पूर्वतयारी:
१. दाट चिकात थोडे दूध घालून कुकरच्या भांडयात चीक उकडून घ्यावा.
२. गार झाला की पनीरप्रमाणे घट्ट होईल. भांडयातून बाहेर काढून स्टीलच्या किसणीवर किसून घ्यावा.
कृती:
१. दोन वाटया साखरेत अर्धी वाटी पाणी घालून पक्का पाक करून त्यात किस घालून घोटावे.
२. त्यात वेलची पूड टाकावी. व तूप लावलेल्या ट्रेमध्ये वडया थापाव्या.
३. गार झाल्यावर चौकोनी तुकडे करावेत.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद
No comments:
Post a Comment