Monday, January 31, 2011

दूधपाक


साहित्य:

१) तांदूळ अर्धी वाटी
२) दूध १ लिटर
३) बदाम काप
४) वेलदोडे ५-६
५) केशर
६) तूप १ चमचा
७) साखर १ वाटी


पूर्वतयारी:

१. बासमती तांदूळ धुवून कोरडे करावेत.
२. एक लिटर दूध उकळायला ठेवावे.


कृती:

१. दुधाला उकळी येऊ लागली की धुतलेल्या बासमती तांदुळाला एक चमचा साजूक तूप चोळून दुधात सोडावेत.
२. मध्यम आचेवर तांदुळ घातलेले दूध उकळत असताना ढवळत राहावे. नाहीतर दूध व तांदूळ खाली लागण्याची शक्यता असते.
३. दूध आटत आले की तांदूळ शिजत येतो. शिजलेल्या बासमती तांदुळाचा सुवास चांगला दरवळतो.
४. तांदूळ शिजवले की साखर घालून उकळी आणून उतरवावे. त्यात वेलदोडे, बदाम काप वगैरे घालावे.


दक्षता:

१. दूधपाक करायला कोणतेही उत्तम तांदूळ चालतात. पण तांदूळ दुधात शिजून संबंध राहायला पाहिजे. मोडायला नको.
२. दूधपाक खूप दाट नसतो. पुरीबरोबर प्रमुख पक्वान्न म्हणून गुजराथेत वाढतात.
३. उत्तर हिंदुस्थानात हीच खीर बासमती तांदूळाची व दाट करतात. गार करून जेवणानंतर स्वीट डीश म्हणून सुध्दा छान लागते.
४. वेलदोडया ऐवजी गुलाब पाण्याचा सुगंध चांगला लागतो. सजावटीसाठी गुलाबपाकळ्यांचा उपयोग करावा.

वरील साहित्यात ४ वाटया खीर होते. २ व्यक्तींना जेवणात पुरते.

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

2 comments:

sharayu said...

माझ्या माहितीप्रमाणे दूधपाक गुजराती पदार्थ आहे.

मराठी संस्कृतीचा नवा अभिमान said...

आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
या पाककृतीला दुधपाक नाव असले तरी ती महाराष्ट्रात बनवली जाणारी तांदळाची खीर आहे. त्यामुळे या पाककृतीला समाविष्ट केले आहे. आपल्या प्रतिक्रिया अशाच कळवत रहा. पुन्हा एकदा धन्यवाद.