Friday, March 4, 2011

पंचरंगी खीर

साहित्य:


१) खवा                २५० ग्रॅम
२) दूध                 २ लिटर
३) साखर             १ वाटी सोडा
४) रवा                २ टे.स्पू.
५) वेलदोडे          ५-६
६) रंग                 ५ प्रकारचे

पूर्वतयारी:

१. पाव किलो खव्यामध्ये २ टेबलस्पून बारीक रवा, चिमूटभर सोडा, निम्मी वेलदोडा पूड, घालून हाताने एकजीव करून मळावे. व त्याचे ५ सारखे भाग करावेत.
२. एक भाग तसाच ठेवून बाकी भागात खायचा हिरवा, लाल, पिवळा व केशरी रंग घालून सर्व भाग मळावेत.
३. मळून झाल्यावर त्याच्या छोटया छोटया गोळ्या कराव्यात.


कृती:

१. दोन लिटर दूध उकळून घ्यावेत. थोडे आटत आले की त्यात वरील गोळ्या सोडाव्यात.
२. सतत ढवळत राहून दूध आटवावे. खव्याच्या गोळ्या दूधात शिजतात व रंगीबेरंगी दूधावर तरंगू लागतात.
३. दूध निम्मे आटले की त्यात एक वाटी साखर घालून खीर खाली उतरवावी.
४. उरलेली वेलदोडा पूड घालून गार करून सर्व्ह करावी.

अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद



No comments: