Monday, March 14, 2011

दामुच्या गोव्याक् वयता भाग-४, आठवणींचे मोती, जेष्ठ नाट्यकर्मी, प्रभाकर पणशीकर यांचा लेख

रसिकहो, हा भाग ‘दामुच्या गोंव्याचो’ शेवटला भाग. या नंतर येणार ‘दादर’. पण हे पश्चिमेकडे दादर विजयनगरच्या पुलाकडून किंवा टिळक ब्रिज क्रॉस करून दादर टी.टी.च्या सर्कलवरून जे श्रीमंतांचं, पारशांचं आणि आपलं वेगळेपण जपणारं ‘दादर पूर्व’ पंतांच्या मनातच राहून गेलं. पंतांचं प्रदीर्घ वास्तव्य दादरला. कॅडल रोडच्या इंगळे हॉस्पिटलच्या जवळच्या धुरूवाडीत. सिध्दीविनायकाचा हा परिसर. पण आपल्या कामालाच पूजा मानणारे पणशीकर इतक्या वर्षात मोजून तीन-चार वेळा सिध्दीविनायकाच्या मंदिरात गेले असतील. ते तिस-या मजल्यावर राहतात. अलिकडे अतिशय शांतपणे ते तो गड चढून जायचे. त्या घरातही डायनिंग टेबलवरती आणि त्याला लागून असलेल्या बेडरूममध्ये आम्ही खूप वेळा लिहायची बैठक मारून लेखन केलेलं आहे. बाहेर विजयावाहिनी टि.व्ही लावून सिरीयल बघत बसलेल्या चार दिवस सासूचे सकट त्यांना मालिकांचं प्रेम आणि पणशीकरांना ‘न्यूज’ एवढी एकच मालिका आवडायची. बाकी त्यांनी टि.व्ही. फार कमी बघितला.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर


No comments: