Wednesday, March 9, 2011

कर्जफेडीसाठी कृती आराखडा, दामदुप्पट, गुंतवणूक सल्लागार, मनोहर दांडेकर यांचा लेख

दलदलीत बुडलेला माणूस किंवा प्राणी जर जास्त धडपड करायला लागला तर त्या दलदलीत जास्तीत जास्त खोल बुडत जातो. त्याचप्रमाणे कर्जात बुडलेला माणूस उगाच वेडीवाकडी धडपड करून स्वतःला जास्तीत जास्त कर्जात बूडवून घेतो. असे कर्जात बुडालेले अनेकजण आपल्या पाहण्यात असतात, पण योग्य कृती आराखडयाचा वापर करून कर्जातून बाहेर पडून वर आर्थिक शिस्त लागल्याने धनवान झालेले असतील. त्यांनी वापरलेला कृती आराखडा व पुढील गोष्टींचा वापर करून अशा कर्जातून कर्जबाजारी माणूस पटकन बाहेर पडू शकतो.

1) आपण आत्ता कोठे आहोत हे पाहणे. चुकलेल्या माणसाला इच्छित स्थळ जेव्हा सापडत नाही तेव्हा मार्गदर्शनासाठी तो नकाशाचा वापर करू शकतो पण, त्यासाठी आपण आत्ता कोठे उभे आहोत हे पाहावे लागते. त्याचप्रमाणे आपली आर्थिक स्थिती आत्ता नक्की काय आहे हे पाहणे फारच महत्त्वाचे असते. त्याशिवाय आपल्याला कोणत्याही योजना आखता येणार नाहीत. त्यातही प्रथमदर्शनी जर कर्जाचा डोंगर फेडण्यापलिकडे वाटत असेल तर मात्र धोक्याची घंटा वाजतेय असं समजून ताबडतोब नियोजनच करायला हवे आहे.

2) दुसरी पायरी दैनंदीन खर्च अक्षरशः शून्यवत केले पाहिजेत. अगदी जीवनावश्यक वस्तुंशिवाय काहीही खरेदी करायचे नाही हे धोरण अवलंबले पाहिजे. त्यातून मग कर्जफेडीसाठी थोडी जास्तीची रक्कम बाजूला पडायला लागेल. मग हळूहळू थकलेले कर्जाचे मागील हप्ते सध्याच्या मासिक हप्त्यासोबत भरायला चालू करा. आणि यापुढे तरी मासिक हप्ते अजिबात थकवू नका.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: