Friday, February 4, 2011
काळ्या वाटाण्याचे सांबार
साहित्य:
१) काळे वाटाणे अर्धा किलो
2) ओलं खोबरं १ वाटी
3) कांदा १
4) मालवणी गरम मसाला ३ चमचे
5) लसूण पाकळ्या ४
6) आलं
7) कोथिंबीर
पूर्वतयारी:
१. काळे वाटाणे पाण्यात रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे.
२. दुस-या दिवशी ते कुकरमध्ये उकडून ठेवावे.
३. १ कांदा उभा चिरून तो गुलाबी होईपर्यंत भाजावा व त्यातच किसलेले ओले खोबरे भाजून घ्यावे.
४. भाजलेले मिश्रण थोडी कोथिंबीर,छोटा आल्याचा तुकडा,४ लसूण पाकळ्या घालून मिक्सरमध्ये बारीक वाटणे.
कृती:
१. एका पातेल्यात तेल टाकून त्यात कांद्याची फोडणी द्यावी.
२. त्यानंतर गरम मसाला व वाटण घालून थोडे परतावे.
३. त्यामध्ये उकडलेले काळे वाटाणे थोडे बारीक करून घालावे.
४. मीठ व पाणी घालून हे सांबार साधारण १० मिनिटे गॅसवर ठेवावे.
५. वाढताना त्यावर ओलं खोबरं आणि थोडी कोथिंबीर घालावी.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment