"प्रार्थना, नामस्मरण
चाले हे शरीर कुणाचिये सत्ते। कोण बोलविते हरीविण॥१॥
देखवी ऐकवी एक नारायण। तयाचे भजन चुकवू नये॥२॥
लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर
नामस्मरण व प्रार्थना ह्या दोन्ही गोष्टींचा व्यक्तीगत व समाज जीवनांवर निश्चितच चांगला परिणाम होतो. दोन्ही शक्ती एकच आहेत.नाम ही एक परमात्म शक्ती आहे. आपण ज्याचे नाव घेतो तोच खरा असून त्याच्याच सत्तेवर सगळे घडते ही जाणीव सतत जागृत राहणे हेच नामस्मरण होय. सर्व दृष्य जगत ईश्वरीय सत्तेवरच चालते आहे. तोच खरा सूत्रधार असून आपण सर्व त्याच्या हातातील कळसूत्री बाहुल्या आहोत. म्हणूनच तुकोबा म्हणतात,
देखवी ऐकवी एक नारायण। तयाचे भजन चुकवू नये॥२॥
वृक्षाचेही पान हाले ज्याचिया सत्ते। राहिली मग अहंता कोठे॥३॥याकरिताच व्यक्तीगत स्थरांवर तसेच सामाजिक स्थरांवर त्याचे नामस्मरण, प्रार्थना होणे आवश्यक आहे. भगवंताचे प्रति प्रेमभाव म्हणजे प्रार्थना होय. प्रार्थना ईश्वर प्राप्तीचे सर्वात प्रभावी साधन आहे. ईश्वराची कृपा झाली तरच सत् गुरूंची प्राप्ती होते. सत् गुरूच आपल्या ख-या सुखाची सोय लावू शकतात. ते एकच तत्व असे आहे की, "तेथे माया स्पर्शो शकेना।"(समर्थ रामदास स्वामी १:४:१)


No comments:
Post a Comment