Tuesday, February 8, 2011

मध - एक अन्नौषधी, ऊदर भरण नोहे, आहार तज्ज्ञ, संपदा बक्षी यांचा लेख

मानवी समाजात उष्टे खाणे कटाक्षाने टाळले जाते. आपण कधी कुणाचे उष्टे खात नाही तर चवीने खाण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु एका माशीचे उष्टे आपण चवीने खातो. इतकेच नाही तर काही धर्मांत त्याला पवित्र मानून पूजेसारख्या क्रियेत महत्त्वाचे स्थान दिलेले आढळते. मध आपण बनवू शकत नाही; ते काम आहे एका माशीचे, जीला आपण ‘मधमाशी’ म्हणतो, व इंग्रजीतही ‘हनी बी’च म्हणतात. मधमाशांनी मानवाला दिलेली एक सुमधूर व औषधी भेट आहे. ब-याच संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळापासून मध औषधात वापरला जातो. शुध्द मध बराच काळ जशाच तसा टिकतो.

शुध्द मधाचे ‘शेल्फ लाइफ’ खूप आहे. मधमाशांच्या जातीप्रमाणे आणि फुलांच्या प्रकाराप्रमाणे मधाच्या रंगात, चवीत, वासात, व गुणधर्मात फरक पडतो. मध कुठल्या ऋतुतील फुलातून आणला आहे यालाही महत्त्व आहे. लालसर, सोनेरी रंगाचा, गोड तोडा तुरट असा हा सुगंधी पदार्थ आहे. तो शरीराला उर्जा व उष्णता पुरवण्याचा एक उत्कृत्ष्ट स्त्रोत आहे. मध हा पिष्टमय पदार्थाचे ‘पूर्व पाचित’असे रूप आहे. आपल्याला उर्जाही पिष्टमय पदार्थामुळे मिळते, व पूर्वपाचित कर्बोदकांमुळे मध लगेच रक्तात मिसळून लगेचच उर्जा प्रदान करतो. मंद पचनसंस्थेसाठी याचा फारच उपयोग होतो. शरीरात लगेच पसरणाच्या याच्या गुंणांमुळे आयुर्वेदात औषधाबरोबर याचा वापर होतो, त्यामुळे औषध लवकर कार्यरत होते.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: